दलित संघटनांचा एससी-एसटी कायद्यामधील बदलांबाबत आज भारत बंद, उत्तरेत काही ठिकाणी हिंसा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: सुप्रीम कोर्टाने अलीकडेच एससी-एसटी कायद्यामध्ये केलेल्या बदलाचा निषेध म्हणून देशभर दलित संघटनांनी पुकारलेला आजचा बंद मोठ्या प्रमाणात सुरु असून उत्तरेतील राज्यांमधून काही ठिकाणाहून हिंसेच्या बातम्या येत आहेत.

कडेगाव तसेच पलूस तालुक्यात भारत बंदचा विशेष प्रभाव नसून जीवनमान नेहमीसारखे सुरु आहे. लवकरच याबाबत भूमिका ठरवण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

या संदर्भात केंद्र सरकारने पुनर्परीक्षण याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकारचे वकील आपली बाजू व्यवस्थित मांडतील असे स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यात बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे अश्या बातम्या आहेत. मेरठ इथे पोलीस स्टेशनला आग लावण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारत बंदच्या अनुषंगाने सीबीएसईने आजची परीक्षा काही ठिकाणी रद्द केली आहे.

 

दलित संघटनांचा एससी-एसटी कायद्यामधील बदलांबाबत आज भारत बंद, उत्तरेत काही ठिकाणी हिंसा

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
औंध येथे बुधवारी (दि. ११) ‘गुलामगिरी हटाव परिषदे’चे आयोजन

कडेगाव: जनता क्रांती दल, महाराष्ट्र यांचे वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचे १९१ व्या जयंती निमित्त बुधवार दि ११ एप्रिल

Close