औंध येथे बुधवारी (दि. ११) ‘गुलामगिरी हटाव परिषदे’चे आयोजन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: जनता क्रांती दल, महाराष्ट्र यांचे वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचे १९१ व्या जयंती निमित्त बुधवार दि ११ एप्रिल रोजी  औंध ” गुलामगिरी हटाव परिषद ” आयोजित करण्यात आली असल्याची माहिती, प्रदेश उपाध्यक्ष आकाश सातपुते यांनी दिली.  परिषदेचे उद्घाटन गायत्रीदेवी पंतप्रतीनिधी यांचे हस्ते होणार आहे.

या परिषदेस प्रमुख उपस्थिती असणार आहे आ. प्रभाकर घार्गे (विधानपरिषद सदस्य), शेखरभाऊ गोरे, सत्यवान कमाने, डॉ .पल्लवी साठे, आकाश सातपुते, नितीन वायदंडे यांची.

या प्रसंगी प्रमुख वक्ते असणार आहेत  प्रा. डॉ.शरद गायकवाड (कोल्हापूर ). परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत पद्मश्री लक्ष्मण माने (‘उपरा’कार ).  प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय उपस्थिती असणार आहे प्रा.राम कांबळे (सांगली), डॉ. मधुकर माने (कराड ),  अशोक जगताप (पुणे ),  प्रा. गोपाल साठे ( कोल्हापूर ), प्रा. धनाजी साठे (सोलापूर ), दीपक खीलारे (मुम्बई ), अजित सदामते (विटा ), कुलदीप देवकुळे , सुहास नांगरे,  तानाजी तुपे (सांगली ), अनिल लोंढे (कराड).

‘गुलामगिरी हटाव परिषदे’चे संयोजन  जनता क्रांती दल, सातारा यांचे वतीने करण्यात आले आहे.  कार्यकर्ते, नागरीक आणि बहुजन चळवळीशी सबंधित  व्यक्तींनी सदर परिषदेस उपस्थित राहावे, असे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेतर्फे करण्यात आले आहे.

औंध येथे बुधवारी (दि. ११) ‘गुलामगिरी हटाव परिषदे’चे आयोजन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
बालगृहात खाऊ वाटप करून ‘ज्ञानहिरा बिल्डकॉन’च्या निकेतन कांबळे यांनी वाढदिवशी ठेवला सामाजिक आदर्श

कडेगाव: येथील नामवंत इंजिनियर आणि ज्ञानहिरा बिल्डकॉनचे सर्वेसर्वा निकेतन कांबळे यांनी अत्यंत सामाजिक जाणीवेने वाढदिवस साजरा करत कराड येथील बालगृहात

Close