हलक्या दर्जाची औषधे शोधून बाहेर काढणारी यंत्रणा सुधारण्याची गरज: कॅगच्या रिपोर्टमध्ये ताशेरे0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

दिल्ली: “जागे व्हा, आपण कदाचित हलक्या दर्जाची औषधे घेत असाल !” हा  राजेंद्र दिवे यांचा लेख कॅगच्या रिपोर्टचा हवाला देवून भारतीय नागरिकांना काहीशी धोक्याची सूचना देत आहे.  ‘द हितवाद’ या वेबसाईटवर त्यांचा लेख प्रकाशित झाला आहे.

यात दिलेल्या माहितीनुसार हलक्या दर्जाची औषधे तपासणारी अन्न आणि औषध प्रशासनाची यंत्रणा तितकीशी सुयोग्य नाही. आणि, हलक्या दर्जाची औषधे बाजारातून बाहेर करण्याची यंत्रणा सक्षम नाही असे ताशेरे कॅगच्या रिपोर्ट मध्ये ओढण्यात आले आहेत.

त्याचबरोबर कॅगच्या रिपोर्टने अन्न आणि औषध प्रशासनाची हलके औषधे शोधून, प्रयोगशाळेत तपासून , त्या अहवालावर आधारित हलक्या दर्जाची औषधे आढळल्यास ती बाजारातून काढून घेणे ही प्रक्रीया सदोष असल्याचे दाखुवून दिले आहे. सदर प्रक्रीयेतून कृती होईपर्यंत अनेक व्यक्ती हलक्या दर्जाची औषधे सेवन करत असल्याचे आढळले आहे, असे श्री. दिवे यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी दिवे यांनी आधार घेतला आहे नागपूर विभागातील ६ वेगवेगळ्या औषधांच्या  तपासणीचा.

दिवे यांनी दिलेल्या काही उदाहरणामध्ये ‘Lycoptin M Syrup’ (लायकोपटीन एम सिरप) आहे. या औषधाची उत्पादन केले गेले मे २०१७ मध्ये आणि त्याची समाप्तीची तिथी होती ऑक्टोबर २०१८. या औषधाचे स्याम्पल नागपूर येथील औषध निरीक्षकाने १८ ऑक्टोबर २०१७ रोजी घेतले आणि तपासणीला दिले. त्याचा अंतिम अहवाल उपलब्ध झाला तो तब्बल ६ महिन्यांनी मार्च २७, २०१८ ला.  अहवालामध्ये सदर औषधाला हलक्या दर्जाचे औषध असे सूचित करण्यात आले होते कारण त्यात वेष्टनावर लिहिलेल्या मात्रेपेक्षा विटामिन ए ६० टक्केच होते आणि विटामिन सी लिहिलेल्या मात्रेपेक्षा ५३ टक्के आढळले. परिस्थिती इतकी चिंताजनक आहे कीअजूनही अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही ते औषध सध्या विकले जाते किंवा नाही, अशी माहिती दिवेकर यांनी दिली आहे.

 

हलक्या दर्जाची औषधे शोधून बाहेर काढणारी यंत्रणा सुधारण्याची गरज: कॅगच्या रिपोर्टमध्ये ताशेरे

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
उन्हाळी सुट्टीत नक्की काय केलं पाहिजे ?

निमंत्रित लेख उन्हाळी सुट्टी म्हणजे विद्यार्थी वर्गाला पर्वणी असते. अर्थात, काही शाखांच्या परीक्षा अगदी मे पर्यंत चालतात त्यामुळे पारंपारीक उन्हाळी

Close