येवलेवाडीत १००० वृक्षारोपण करत तरुण समाजसेवकाने ठेवला पर्यावरण संवर्धनाचा आदर्श0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: कराड-विटा रोडवर असणारे येवलेवाडी हे प्रगतीशील गाव म्हणून ओळखले जाते याला आता आणखी एक नवे कारण समोर आले आहे. बऱ्याच ठिकाणी फक्त फोटोसाठी वृक्षारोपण सुरु असताना या लहानश्या गावातील उद्योजक, राजकीय प्रतिनिधी आणि अगदी तरुण वयापासून समाजकारणात अग्रेसर असणारे दत्तात्रय ननवरे यांनी स्वतःच्या जमिनीत उत्स्फूर्तपणे १००० झाडे लावण्याचा संकल्प केला आणि वेगात काम सुद्धा सुरु केले आहे.

कॉंग्रेसचे तरुण कार्यकर्ते व नेते म्हणून गावात व भागात परिचित असणारे दत्तात्रय ननवरे यांनी व यांच्या कुटुंबाने एकत्रित येवून येवलेवाडी हरीत करण्यासाठी एक क्रांतिकारी पाउल उचलले आहे.

श्री. ननवरे यांनी दिलेल्या माहिती नुसार नारळ, रामफळ, आंबा, चंदन, सीताफळ, सागवान अश्या प्रकारची सुमारे १००० झाडे लावण्यात येणार आहेत.

पटकन उत्पन्न  देणारी पिके किंवा झाडे लावणे याकडे शेतकरी वर्गाचा जास्त कल असल्याने साधारणतः अशा प्रकारची १० ते १५ वर्षे उशीरा उत्पन्न देणारी झाडे लावण्यास कोणी धजत नाही. असे असतानाही प्रगतीशील शेतकरी दत्तात्रय ननवरे यांनी वृक्ष शेती करण्याचे ठरवले. यामध्ये त्यांच्या कुटुंबियांचे मोठे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, कृषी विभागानेही अत्यंत उपयुक्त माहिती देवून सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.

शाश्वत शेती करताना आपल्या वाट्याला आलेले पर्यावरण संरक्षणाचे कामही प्रत्येक शेतकऱ्याने आवर्जून केले पाहिजे. यामध्ये फक्त रसायन विरहित शेती करून भागणार नाही तर निसर्गाचे चक्र संतुलित राहील यासाठी आवश्यक तेवढे वृक्ष लावले गेले पाहिजेत. सरकारी यंत्रणेने यामध्ये शेतकरी तसेच इतरांना प्रोत्साहन देवून सहकार्य केले तर प्रत्येक गावाच्या क्षेत्रापैकी किमान ३० टक्के क्षेत्र झाडांमुळे हरित होईल आणि जागतिक तापमान वाढ व हवामानातील बदल नियंत्रणात येईल, अशी आशा ननवरे यांनी व्यक्त केली.  यासाठी शेतीतील विशिष्ट क्षेत्र वृक्ष शेतीसाठी ठेवले तर त्यामुळे अत्यंत हुकमी पद्धतीने निसर्ग संतुलन राखता येईल. याचा फायदा शेतकऱ्यांना तर होईलच पण पर्यावरणाचा दर्जा सुधारल्याने आरोग्य, कला, संस्कृती सुद्धा वाढीस लागेल असे ननवरे यांनी स्पष्ट केले.

तरुण पिढीने व्हाटसप आणि इतर तांत्रिक खेळांमध्ये गुंतून राहून आपल्या आजूबाजूच्या निसर्गाच्या रक्षणाकडे व संवर्धनाकडे दुर्लक्ष करणे भविष्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. तरुणाईने निसर्गापासून दूर न जाता निसर्गात रमावे व वृक्षशेती करून निसर्ग संवर्धनाकडे वळावे, असे आवाहन दत्तात्रय ननवरे यांनी केले.

उद्योजकतेच्या नावाखाली निसर्गाची व पर्यावरणाची हानी करणारे उद्योग उभारून पटकन नफा मिळवता येतो काय, यावर डोळा ठेवून असलेले बहुतेक शिकलेले तरुण आणि अत्यंत तरुण वयात समाजकारण, राजकारण आणि शेती तसेच उद्योग या सर्व आघाड्यावर यशस्वी ठरलेले श्री ननवरे यांच्या निसर्ग संवर्धन करत जपलेली  शेती या व्हिजनमुळे एक मोठा आदर्श समोर ठेवला गेला आहे.

येवलेवाडीत १००० वृक्षारोपण करत तरुण समाजसेवकाने ठेवला पर्यावरण संवर्धनाचा आदर्श

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
हलक्या दर्जाची औषधे शोधून बाहेर काढणारी यंत्रणा सुधारण्याची गरज: कॅगच्या रिपोर्टमध्ये ताशेरे

दिल्ली: "जागे व्हा, आपण कदाचित हलक्या दर्जाची औषधे घेत असाल !" हा  राजेंद्र दिवे यांचा लेख कॅगच्या रिपोर्टचा हवाला देवून

Close