यंदा भाजपाची कमाई इतर ५ राष्ट्रीय पक्षांच्या एकत्रित कमाईपेक्षा दुप्पट0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: भाजपने राष्ट्रीय पक्ष म्हणून ५७० कोटी (२०१५-१६) वरून या वर्षी ८१ % वृद्धी दाखवत सुमारे १०३४ कोटीची कमाई इलेक्शन कमिशनला सादर केलेल्या ऑडीट मध्ये दाखवली आहे. या संबंधी सविस्तर वृत्त भारती जैन यांनी टाईम्स वृत्तवाहिनी तर्फे दिले आहे.

८ फेब्रुवारीला सादर केलेल्या अहवालानुसार अशी माहिती समोर आली आहे  की भाजपने या आर्थिक वर्षात इतर सहा राष्ट्रीय पक्षांपेक्षा दुप्पट कमाई केलेली आहे. इतर सहा राष्ट्रीय पक्ष आहेत- कॉंग्रेस, बसपा, तृणमूल कॉंग्रेस, सीपीएम, सीपीआय, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी.

कॉंग्रेस सत्तेत असताना (२००४-०५ ते २०१३-१४) झालेल्या कमाईच्या तुलनेत भाजपने सादर केलेल्या रिसीट तुलनेने जास्त असल्याचे समोर आले आहे.

राजकीय पक्षांच्या कमाईचे स्रोत मुख्यत्वे स्वेच्छेने देण्यात आलेल्या देणग्या आणि कुपनची विक्री, हे असल्याचे कळते. त्याचबरोबर, मेंबरशिप फी, गुंतवणुकीचा परतावा, व स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांनी दिलेल्या देणग्या यांचाही समावेश या कमाईमध्ये होतो.

खाजगी देणग्या या प्रामुख्याने  उद्योजकांकडून आणि व्यावसायिकांकडून आलेल्या असतात.

 

 

यंदा भाजपाची कमाई इतर ५ राष्ट्रीय पक्षांच्या एकत्रित कमाईपेक्षा दुप्पट

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
येवलेवाडीत १००० वृक्षारोपण करत तरुण समाजसेवकाने ठेवला पर्यावरण संवर्धनाचा आदर्श

कडेगाव: कराड-विटा रोडवर असणारे येवलेवाडी हे प्रगतीशील गाव म्हणून ओळखले जाते याला आता आणखी एक नवे कारण समोर आले आहे.

Close