भारत आणि चीनमध्ये जनतेच्या उत्पन्नातील असमानता चुकीच्या सरकारी धोरणांमुळे0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: नुकत्याच जाहीर झालेल्या २०१८ च्या जागतिक असमानता अहवालानुसार सर्व देशात वेगवेगळ्या वेगात उत्पन्नातील असमानता वाढली आहे. युरोप खंडात ती सर्वात कमी असून मध्य पूर्वेत सर्वात जास्त असल्याचे समोर आले आहे.

असित बिस्वास आणि क्रेट हर्ले या संशोधक द्वयींनी सविस्तर पद्धतीने पृथकरण करत भारत आणि चीनमधील उत्पन्नातील असमानता सरकारी धोरणाचा परिणाम असल्याचे अधोरेखित केले आहे.

चीनमध्ये भौगोलिक पद्धतीने उत्पन्नातील असमानता दिसत असून यामध्ये किनारी प्रदेश प्रगत झालेत तर आतील प्रदेशातील ग्रामीण भागांकडे अजूनही विकासाची गंगा आलेली नसल्याचे दिसत आहे.

या उलट भारतात ५५ टक्केपेक्षा जास्त संपत्ती ही फक्त १० टक्के श्रीमंत लोकांच्या हातात आहे. भारतात गरिबी आणि उत्पन्नातील असमानता हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आवश्यक आहे. परंतु, यात सरकार अपयशी ठरल्यामुळे शेतीसारख्या अल्प उत्पन्न देणाऱ्या व बेभरवशी स्रोतावर बरीच जनता अजूनही अवलंबून आहे.

भारतातील सरकारने दरवर्षी १० मिलियन नोकऱ्या तयार करण्याचे वाचन दिले होते पण २०१६ चे आकडे पाहता फक्त २३०००० नोकऱ्या तयार झाल्याचे दिसत आहे. सगळ्यात दुर्दैवी बाब म्हणजे एका बाजूला शेतीमध्ये रोजगार तयार होण्याचे प्रमाण कमी झाले आहे तर शहरातील उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत नाही. यामुळे एकूण रोजगार निर्मिती कमी झाली आहे. याउलट सरकार शहरीकरणाला पाठबळ देत आहे परंतु याचा फायदा बहुतेक जनतेला समान प्रमाणात मिळत नसल्याचे चित्र आहे.

बऱ्याच तज्ञांचे मत असे झाले आहे की नोटबंदी किंवा निश्चलनीकरण आणि जीएसटी या दोन घटकांमुळे असंघटीत क्षेत्रामधील रोजगार आणि उत्पन्न कमी झाले आहे. याचा मोठा धक्का स्वतःचे गाव सोडून कामासाठी शहरामध्ये  फिरणाऱ्या जनतेवर जास्त झाला आहे.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत धोरणामध्ये अमुलाग्र बदल होत नाहीत आणि असमानता दूर करण्याची प्रबळ इच्छा सरकारे दाखवत नाहीत तोपर्यंत गरिबी आणि उत्पन्नातील असमानता दूर होणार नाही.

भारत आणि चीनमध्ये जनतेच्या उत्पन्नातील असमानता चुकीच्या सरकारी धोरणांमुळे

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
यंदा भाजपाची कमाई इतर ५ राष्ट्रीय पक्षांच्या एकत्रित कमाईपेक्षा दुप्पट

कडेगाव: भाजपने राष्ट्रीय पक्ष म्हणून ५७० कोटी (२०१५-१६) वरून या वर्षी ८१ % वृद्धी दाखवत सुमारे १०३४ कोटीची कमाई इलेक्शन

Close