यंदा ‘राष्ट्रवादी’चा कर्नाटकात उमेदवार नाही ; कॉंग्रेसला बिनशर्त पाठींबा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कर्नाटकात एकही उमेदवार उभा करणार नाही व कॉंग्रेस ला विनाशर्त पाठींबा देणार असल्याची माहिती, डी. पी. त्रिपाठी यांनी दिली.

‘राष्ट्रवादी’ची ही चाल भाजप ला सत्तेमध्ये येवू न देण्यासाठी तसेच कॉंग्रेस पुन्हा निवडून यावे यासाठी असल्याचे सांगितले गेले.

मागील निवडणुकीमध्ये एनसीपी ने कर्नाटकमध्ये सहा जागा लढवल्या होत्या. सोबतच तीन अपक्ष उमेदवारांना पाठींबा दिला होता.

भाजप जर कर्नाटकातील निवडणूक हरली तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप सत्ता गमावण्याची सुरवात कर्नाटकमधून होईल, असे सुतोवाच त्रिपाठी यांनी केले. यासंबधी सविस्तर वृत्त इंडियन एक्स्प्रेस वृत्त समूहाने दिले आहे.

दरम्यान लिंगायत धर्मियांच्या आंदोलनाला कॉंग्रेसने पाठींबा दिल्याने कॉंग्रेस जिंकण्याची शक्यता तयार झाली आहे. लिंगायत मतदार जवळपास १७ टक्के आहेत आणि काही मतदारसंघामध्ये लिंगायत मतदारांची मर्जी असल्याशिवाय कोणीही निवडून येवू शकत नाही असे चित्र आहे.

भाजपच्या शहा यांनी स्वतंत्र लिंगायत धर्म मान्यता आंदोलनाच्या मागण्या अमान्य केल्याने कर्नाटकमध्ये नक्की मतदार कशाप्रकारे मतदान करतील याविषयी संदिग्धता निर्माण झाली आहे. त्यात भर म्हणून ३०० पेक्षा जास्त लिंगायत मठांच्या मठाधीशांनी कॉंग्रेसला पाठींबा दिल्याने मतांची विभागणी होणार यात शंका नाही.

यावर विशेष तोडगा अजूनही भाजपकडे नसल्याचे सध्या चित्र आहे. महाराष्ट्रामध्ये मागील निवडणुकीच्या आधी विविध धर्माच्या मठाधीशांना भेटून भाजपने आपली पक्षीय भूमिका मांडली होती, हे नोंद घेण्यासारखे आहे.

यंदा ‘राष्ट्रवादी’चा कर्नाटकात उमेदवार नाही ; कॉंग्रेसला बिनशर्त पाठींबा

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
भारत आणि चीनमध्ये जनतेच्या उत्पन्नातील असमानता चुकीच्या सरकारी धोरणांमुळे

कडेगाव: नुकत्याच जाहीर झालेल्या २०१८ च्या जागतिक असमानता अहवालानुसार सर्व देशात वेगवेगळ्या वेगात उत्पन्नातील असमानता वाढली आहे. युरोप खंडात ती

Close