कांदा हाताने फोडून खाणे सर्वात आरोग्यदायी का समजले जाते?0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कांदा खाण्याविषयी समाजात अनेक समज-गैरसमज आढळतात. सगळ्यात प्रमुख म्हणजे कांदा खाल्ल्याने बुद्धी मंद होते, हा गैरसमज. असल्या काड्या घालणे कैक शतके सुरु असले तरीही मराठी माणसांनी कांद्याला इतका जीवाशी धरलेला आहे की बोलायला नको. तसचं काहीतरी विशेष महत्व कांद्याचे असणार यात शंका नाही.

कांदा व लसून न खाणारे समाज भारतात पूर्वंपार आहेत त्यामुळे कांद्याविषयी संदिग्धतेचे वातावरण आहे. कांद्याला आयुर्वेदाने तामसिक गुणाचा समजले आले तरी ज्यावेळेला शरीराला कांदा खाणे आवश्यक असते त्यावेळी तो खाल्ल्याने तामसिक प्रभावाची चिंता करण्याची गरज नसते असे, डॉ. बी. के. प्रशांथ यांनी स्पष्ट केले आहे.

ते काहीही आले तरी कांदा हा मराठी माणसाच्या आयुष्याच्या अविभाज्य भाग आहे. त्यातूनही ग्रामीण भागात प्रत्येक जेवणात हाताने कांदा फोडून खाणे, यात एखाद्या साधना करणाऱ्या योगी व्यक्तीची नियमितता दिसेल. कांदा हा असा महाराष्ट्राच्या पाचवीला पुजलेला आहे. म्हणूनच तो मराठी अभिमानाचा मानबिंदू आहे.

कांद्याचे औषधी गुणधर्म आयुर्वेदिक तज्ञांकडून समजून घेणे हा एक ज्ञानदायी अनुभव असतो. त्याहीपेक्षा, कांद्याचा पारंपारीक खाण्यातला आणि औषध म्हणून केला जाणारा वापर ग्रामीण भागात स्वतःच्या डोळ्यांनी बघणे, शक्य झाल्यास जागून स्वानुभव घेणे यापेक्षा आनंददायी अनुभव नाही.

सध्याच्या वाढत्या पाश्चात्य प्रभावाखाली आणि आधुनिक राहणीमान म्हणजे काहीतरी ग्रेट असते असे समजून राहणारी तथाकथित सुशिक्षित माणसे ‘कांदा फोडून खाणे’ या प्रकाराविषयी नको इतकी किळस प्रकट करतात. अर्थात, याला त्यांचे अज्ञान जबाबदार आहे, हे सिध्द होत आहे. नक्की काय आहे महत्व कांदा फोडून खाण्याचे?

आजपर्यंत कांदा फोडून खाण्याचे शास्त्रीय स्पष्टीकरण दिले जात नव्हते पण अलीकडे बऱ्याच पारंपारीक पद्धती आधुनिक विज्ञानाच्या समजण्याच्या पात्रतेच्या पलीकडे आहेत हे जसे सिद्ध होत आहे तसतसे पारंपारीक ज्ञानाचे महत्व वाढत आहे. यामध्ये काही निर्बुद्ध लोकांच्या संघटना विशिष्ट जातींच्या विशिष्ट संस्कृतींशी पारंपारीक ज्ञानाचा संबंध जोडून श्रेय लाटण्याचा टुकार प्रयत्न करतानाही दिसतात. असे असले तरीही ग्रामीण लोकसंस्कृतीमध्ये इतके अफाट पारंपारीक ज्ञान तयार होत असते व टिकवून पुढच्या पिढ्यात नेले जाते त्याला तोड नाही. यात श्रेय घेणे वगेरे प्रकार इथल्या मूळ संस्कृतीमध्ये दिसत नाहीत. कांदा खाण्याच्या आपल्या पद्धतींमध्ये आधुनिकतेच्या नावाखाली अनेक चुकीच्या गोष्टी आपण करत आलो आहे. या सगळ्यांना छेद देणारे ज्ञान म्हणजे ‘कांदा’ फोडून खाण्याचे महत्व.

कांदा हा सल्फर तसेच इतर रासायनिक घटकांचा अंतर्भाव असणारा नैसर्गिक पदार्थ आहे. जेव्हा कांदा कापला जातो तेव्हा त्यातील वेगवेगळ्या रासायनिक द्रव्यांचा संयोग होणे लगेच सुरु होते. विशेषतः, ज्या खोलीत कांदा कापला आहे त्या खोलीतील जीवाणू कांद्याकडे आकर्षिले जातात आणि मरतात. आजारी माणसाच्या बिछान्याजवळ किंवा खोलीत कांदा ठेवून तिथल्या जीवाणूंचा प्रभाव कमी करणे, हेही पारंपारीक ज्ञान सर्वज्ञात आहेच. यासाठीच कांदा फोडल्यानंतर पटकन खाणे उपयुक्त असते.

कांदा जेव्हा फोडला जातो तेव्हा त्यातील रासायनिक पदार्थाचा एक थर विलग होतो. हे कांदा कापून खाताना साध्य होत नसते कारण तो थर कांद्याबरोबर कापला जातो आणि आहारात येतो. यासाठीच बहुदा आपले पूर्वज कांदा जेवताना अगदी पहिला घास खाण्याआधी कांदा फोडून घेत आणि जेवणाला सुरवात करत. इतके सुधारीत वैज्ञानिक ज्ञान कैक पिढ्यांच्या प्रयोगातून आणि अनुभवातूनच साध्य होते. आपण शेवटी फोडून कधी कांदा खाल्लेला आठवते काय?

कांदा कापून जास्त वेळ ठेवलेला असेल तर त्याच्यातील रासायनिक द्रव्ये वातावरणातील घटकांबरोबर संयोग सुरु करतात. यामुळे कांद्याचा म्हणावा असा औषधी फायदा होत नसतो. यासाठी अगदी जेवताना सुरवातीला कांदा फोडून खाणे हेच योग्य आहे. विशेषतः, ढाबा, हॉटेल इत्यादी ठिकाणी बरेच तास किंवा कधी कधी एक दिवसआधी कापलेला कांदा खाणाऱ्या सुशिक्षित लोकांनी ‘कांदा फोडून खाण्याचे महत्व’ स्वतः अभ्यासले तर स्वतःचे आरोग्य परत मिळवण्याच्या प्रक्रीयेला गती मिळेल. ज्यांना कांदा फोडून खाण्याचे महत्व समजले आहे त्यांनी कोणताही कापून दिलेला कांदा, घरी किंवा बाहेर, खाणे योग्य की अयोग्य ठरवावे. सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे ताटावर बसलेले असताना अखंड कांदा मागवणे आणि स्वतःच्या हाताने फोडून खाणे. इतके वैज्ञानिक वागणे जमायला इच्छाशक्ती लागते आणि पारंपारिक ज्ञानाचा तेवढाच स्वाभिमान लागतो.

कांदा खावा किंवा खाऊ नये, खाल्ला तर किती खावा, कोणत्या आजारात कांदा कसा खायला हवा इत्यादी प्रश्न आपले डॉक्टर चांगल्या प्रकारे हाताळू शकतात.

नव्या पिढीला शिकवताना बाप मूर्ख होता, आजा महामूर्ख आणि पणजा शतमूर्ख होता अश्या पद्धतीचे शिक्षण देणे, ही आधुनिक परंपरा किती आत्मघातकी आहे, हे छोटासा फोडलेला कांदा शिकवून जातोय. यापेक्षा आणखी काय उदाहरण हवे आणि म्हणे कांदा खाल्य्याने अक्कल कमी होते !

नोंद: वरील लेखामध्ये कोणताही वैद्यकीय दावा करण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही. तसे जाणवल्यास कृपया फक्त सामान्य पारंपारिक आरोग्य माहिती दिली आहे असे समजून घ्यावे. आरोग्याविषयी आपण ठरवलेले बदल व गोष्टींचा वापर नेहमीच आपल्या वैद्यास किंवा डॉक्टरला विचारून करावा. वरील लेख वाचून आपण स्वतः केलेल्या कृतीस अथवा त्यापासून झालेल्या फायद्या-तोट्याला ‘कडेगाव-पलूस लाइव न्यूज’ कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.

कांदा हाताने फोडून खाणे सर्वात आरोग्यदायी का समजले जाते?

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
यंदा ‘राष्ट्रवादी’चा कर्नाटकात उमेदवार नाही ; कॉंग्रेसला बिनशर्त पाठींबा

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कर्नाटकात एकही उमेदवार उभा करणार नाही व कॉंग्रेस ला विनाशर्त पाठींबा देणार असल्याची माहिती, डी. पी.

Close