कडेगावमध्ये म. बसवेश्वर जयंती भक्तीपूर्ण उत्साहात साजरी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज कडेगाव इथं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

मुख्य जयंती समारोह बस स्थानकाजवळील डॉ. आंबेडकर चौकात आयोजित करण्यात आला होता.

‘बसव ब्रिगेड’ च्या तालुका व शहर शाखेच्या अग्रेसर आयोजनातून या वर्षीपासून कडेगावमध्ये म. बसवेश्वर जयंती आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष श. संदीप माळी यांनी दिली.

आज पार पडलेल्या जयंती समारंभामध्ये बसपा पदाधिकारी शिवलिंग सोनवणे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र थोरात, पोलीस निरीक्षक श्री पुजारी, लिंगायत उद्योजक श. प्रमोद लोखंडे तसेच  कडेगाव नगरपंचायतचे सदस्य श. श्रीरंग माळी, श. सौ. अनिता देशमुखे तसेच श्री. नितीन शिंदे सामील होते.

म. बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रसिद्ध लिंगायत उद्योजक श. शिवलिंग माळी यांनी इतर मान्यवरांसोबत केले.

या प्रसंगी बोलताना शिवलिंग सोनवणे यांनी महात्मा बसवेश्वर यांचे लिंगायत धर्मसंस्थापनेचे कार्य आणि त्यामागील क्रांतिकारी भूमिका स्पष्ट केली. सर्वसमावेशक आणि जाती-धर्म भेद रहित धर्म स्थापन करणे हे तत्कालीन समाजामध्ये अवघड असणारे काम बसवेश्वरांनी लीलया पार पाडले. या क्रांतिकारी प्रेरणा असल्यानेच लिंगायत धर्म या मातीत रुजला व वाढला असे प्रतिपादन सोनवणे यांनी केले.

लिंगायत धर्मातील काही प्रमुख सूत्रांचे विवेचन सामाजिक संशोधक व लिंगायत धर्म अभ्यासक श. डॉ. गोविंद धस्के यांनी केले.

समारोपाचे व आभाराचे भाषण श. लोखंडे यांनी केले.

आजच्या जयंती उत्सवामध्ये लिंगायत धर्मीय नागरीक विशेषतः तरुण वर्ग, तसेच गावातील व तालुक्यातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये बसव ब्रिगेडचे पदाधिकारी श. संदीप माळी (कडेगाव तालुका अध्यक्ष), श. हर्षल वाघिरे (शहर अध्यक्ष ), श. प्रशांत विभूते (तालुका सचिव), श. अधिक तडसरे (शहर सचिव), श. दीपक कोकणे (तालुका संपर्क प्रमुख) यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.

 

कडेगावमध्ये म. बसवेश्वर जयंती भक्तीपूर्ण उत्साहात साजरी

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
आद्य क्रांतिकारक, युगप्रवर्तक, जगतज्योती, समतानायक, महात्मा बसवण्णा

लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त विशेष निमंत्रित लेख प्राचीन भारताचा इतिहास जितका समृद्ध आहे, तितकाच, किंबहुना त्याहीपेक्षा

Close