तडसरमध्ये डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते अनेक विकासकामांचा शुभारंभ0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

तडसर:  कडेगांव तालुक्यातील तडसर या विकासोन्मुख गावात युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत ऊर्फ बाळासाहेब कदम यांच्या हस्ते तब्बल ८५ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. डॉ. पतंगराव कदम यांच्या विकासाच्या धोरणानुसार सर्व विकासकामे निश्चितच पार पडतील असे या प्रसंगी डॉ. विश्वजीत यांनी सांगितले.

याचवेळी आधुनिक पद्धतीने बांधण्यात आलेल्या  डॉ. पतंगराव कदम बसस्थानकाचे उदघाटनसुद्धा पार पडल्याची माहिती तडसरचे सरपंच हणमंतराव पवार यांनी दिली.

अनेक विकासकामासोबतच मुस्लिम समाज दफनभूमी साठी श्रीपतराव तात्या कदम ट्रस्ट मधुन अडीच लाखांचा चेक मुस्लिम समाज बांधवांना देण्यात आला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते समीर मुल्ला यांनी दिली.

डॉ. पतंगराव कदम यांनी मुस्लीम समाजाला दिलेले वचन त्यांचे चिरंजीव बाळासाहेबांनी पूर्ण केले. या प्रसंगी डॉ. विश्वजीत कदम यांनी साहेबांनी सुरु केलेली तसेच नियोजनात असलेली सर्व कामे पूर्ण केली जाणार असल्याचे सांगितले.

या प्रसंगी जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.

 

तडसरमध्ये डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते अनेक विकासकामांचा शुभारंभ

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावमध्ये म. बसवेश्वर जयंती भक्तीपूर्ण उत्साहात साजरी

कडेगाव: लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज कडेगाव इथं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्य जयंती समारोह बस

Close