महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा ‘विशेष दर्पण पुरस्कार’ संपत मोरे यांना जाहीर0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: ख्यातनाम पत्रकार संपत मोरे यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा विशेष दर्पण पुरस्कार जाहीर झाला आहे.

यंदा या पुरस्काराचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. संपत मोरे हे ग्रामीण स्तंभलेखक तसेच दुर्लक्षित व्यक्ती व प्रश्न यांना समोर आणणारे पत्रकार म्हणून प्रख्यात आहेत.

विशेष दर्पण पुरस्काराचे स्वरूप असे आहे : सन्मानचिन्ह , शाल , रोख रक्कम, व पुस्तके. या वर्षीचा पुरस्कार वितरण समारंभ जेष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते पुणे येथे १ मे रोजी दुपारी ३ वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात होणार आहे.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ असुन कार्यकारी विश्वस्त विजय मांडके आहेत.

पत्रकार संपत मोरे यांच्या निवडीमुळे सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तसेच ग्रामीण विकासासाठी पत्रकारीतेला माध्यम समजून काम करणाऱ्या होतकरू व ग्रामीण मुल्यवादी तरुणांना प्रोत्साहन मिळेल, अशी आशा अनेक पत्रकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

निवडीबद्दल पत्रकार संपत लक्ष्मण मोरे यांचे सार्वत्रिक अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा ‘विशेष दर्पण पुरस्कार’ संपत मोरे यांना जाहीर

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘स्वाभिमानी’च्या कडेगाव तालुका अध्यक्षपदी शिवणीचे राजेंद्र माने

शिवणी: इस्लामपुर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यानी कडेगाव तालुका अध्यक्षपदी शिवणीचे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी राजेंद्र

Close