नेर्ली खोऱ्यात तीव्र पाणी टंचाई: गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: तालुक्यामध्ये एका बाजूला दुथडी भरून पाणी वाहत असताना काही भागात तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. नेर्ली खोऱ्यातील नेर्ली, कोतवडे, अपशिंगे, खंबाळे ही गावे टेम्भू योजनेच्या पहिल्याच टप्प्यात येत असूनसुद्धा सध्या या चारही गावात पिण्याचे पाणी मिळणे मुश्किल होऊन बसले आहे. पाण्याच्या असमान वितरणामुळे अशी भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले.

अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर पाणी मिळाले नाही तर येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नेर्ली गावच्या ग्रामसभेत देण्यात आला.

लवकरात लवकर टेम्भू चे पाणी सोडण्यात येऊन नेर्ली खोऱ्यातील पाण्यासाठीची वणवण थांबावी यासाठी नेर्ली ग्रामस्थांतर्फे तहसीलदार कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, पंचायत समिती व जलसंपदा विभाग येथे निवेदन देण्यात आले.

यावेळी नेर्लीच्या सरपंच शारदा पाटील, सुनील पाटील, सिकंदर मुजावर, काका पाटील, चेतन सावंत व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

नेर्ली खोऱ्यात तीव्र पाणी टंचाई: गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावमध्ये दारूबंदी का झाली नाही?

गेले कित्येक आठवडे महिला व राजकीय-सामाजिक कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नानंतरही कडेगाव इथं चार प्रभागांमध्ये दारूबंदीला यश मिळाले नाही आणि बाटली

Close