माझी उमेदवारी ही संधी नव्हे तर साहेबांचे काम पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी: डॉ. विश्वजित कदम0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (कौशल धर्मे): काँग्रेस पक्षाने मला दिलेली उमेदवारी ही संधी नसून जबाबदारी असल्याचे वक्तव्य डॉ. विश्वजित कदम यांनी काल झालेल्या कार्यकर्त्यांच्या मिटिंगमध्ये केले. कडेगाव येथील कन्या महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या मीटिंगला कडेगाव आणि पलूस तालुक्यातले काँग्रेस कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना, ते म्हणाले की, पक्षाने उमेदवारी दिली आहे आणि त्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. मोहनशेठ (दादा) कदम यांचे समर्थन आहे, हे खूप महत्वाचे आहे. पक्षाच्या नेतृत्वाने आपल्यालाच उमेदवारी दिल्याचे या प्रसंगी त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी ही पोटनिवडणूक येत्या २८ मे रोजी होत आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सुज्ञ कार्यकर्त्यांची व मतदारांची इच्छा असली तरीही निवडणूक होणारच हे काही उमेदवारांनी भरलेल्या अर्जावरून दिसत आहे.

सोमवार दि. ७ मे रोजी साहेबांच्या सोनहिरा कारखान्यासमोरील समाधी स्थळाचे दर्शन घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधा-कृष्ण विखे पाटील, विधानपरिषद सदस्य आ. मोहनराव कदम यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार असल्याचे यावेळी विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भाजप ची भूमिका अजूनही गुलदस्त्यात असली तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस ने डॉ. विश्वजित कदम यांना जाहीर पाठिंबा दिल्याने ही पोटनिवडणूक ट्रायल मॅचच मानली जात असून खरी लढत २०१९ च्या विधानसभेलाच असेल, अशी चर्चा मतदारसंघात वेग घेत आहे.

काल झालेल्या कार्यकर्त्यांच्या मीटिंगमध्ये आ. मोहनराव कदम, लालासाहेब यादव, शांताराम कदम, जितेश कदम आणि काँग्रेसचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

माझी उमेदवारी ही संधी नव्हे तर साहेबांचे काम पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी: डॉ. विश्वजित कदम

by कौशल धर्मे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
नेर्ली खोऱ्यात तीव्र पाणी टंचाई: गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

कडेगाव: तालुक्यामध्ये एका बाजूला दुथडी भरून पाणी वाहत असताना काही भागात तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. नेर्ली खोऱ्यातील नेर्ली,

Close