अखेरच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहीन: डॉ. विश्वजीत कदम0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (कौशल धर्मे): पलूस-कडेगावची जनताच माझी ढाल आहे, अश्या शब्दात आज  दिवंगत आ. डॉ. पतंगराव कदम यांचे सुपुत्र व महाराष्ट्र प्रदेश युवा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. साहेबांच्या विकासकामांनी पावन झालेल्या पलूस-कडेगाव परिसरातील माती कपाळाला लावत डॉ. विश्वजीत कदम यांनी अखेरच्या श्वासापर्यंत पलूस-कडेगावच्या जनतेची सेवा करत राहीन, अशी ग्वाही दिली.

कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने विश्वजीत कदम यांना देवू केलेली राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी न स्वीकारता ज्या भागाने माया दिली, प्रेम दिले त्या आपल्या मातीची व जनतेची सेवा करण्याचा निर्धार पक्ष नेतृत्वाला कळवत मी या निवडणुकीस उभा राहत असल्याचे कदम यांनी सांगितले.

माजी मंत्री व आमदार दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून यासाठी कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्र प्रदेश युवा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली आहे. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कडेगाव इथं दाखल केला. या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या जन निर्धार सभेमध्ये डॉ. विश्वजीत कदम बोलत होते.

दरम्यान,  उमेदवारी अर्ज दाखल करण्यास डॉ. विश्वजीत कदम यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते पाठींबा दर्शवण्यासाठी उपस्थित होते त्यामुळे काही काळ तडसर रोडवरील तहसीलदार कार्यालयासमोर वाहतुकीची कोंडी झाली होती. आज सकाळपासूनच चार जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्राच्या इतर भागातून अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित झाल्यामुळे सर्व रस्त्यांवर दुतर्फा वाहने व गर्दी अशी स्थिती होती.

आजच्या जन निर्धार मेळाव्यामध्ये जवळ-जवळ अर्धा तास त्यांनी अत्यंत भावपूर्ण शब्दात आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी बोलताना त्यांनी आपले वडील दिवंगत आ. डॉ. पतंगराव कदम यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. भागात काम चालू राह्यलं पाहिजे, असं साहेब सतत म्हणायचे. अतिवृष्टी असो व दुष्काळ, प्रत्येकवेळी साहेब मतदार संघातील जनतेला मदत मिळवून द्यायचे. अश्या पद्धतीने मदत मिळणारा पलूस-कडेगाव हा वेगळाच मतदारसंघ असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. येईल त्याला मदत करणे ही साहेबांची वृत्ती होती, अशा शब्दात त्यांनी साहेबांना श्रद्धांजली वाहिली.

आज कडेगाव इथं आयोजित करण्यात आलेल्या जन निर्धार मेळाव्यामध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी तसेच आरपीआय व इतर मित्रपक्षांचे अनेक नेते उपस्थित होते. उन्हाचा कडाका असतानाही मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते तसेच नागरिक या प्रसंगी उपस्थित होते.

आजच्या जन निर्धार मेळाव्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार प्रतीक पाटील, माण-खटावचे नेते जयकुमार गोरे, कोल्हापूरचे नेते सतेज (बंटी) पाटील, सांगली विधानपरिषदेचे आमदार मोहनराव कदम, ज्येष्ठ नेते विलासराव शिंदे, सांगलीचे नेते सत्यजित देशमुख, सांगलीच्या नेत्या जयश्रीताई पाटील, पुण्याचे नेते अभय छाजेड, कराडचे नेते आनंदराव पाटील, पृथ्वीराज पाटील, सांगलीचे नेते हारुणभाई शिकलगार, माजी आमदार हफिजभाई धतुरे यांचे सुपुत्र,  आर पी आय चे नेते व साहित्यिक शंकरराव खरात यांचे नातू, विट्याचे नेते सदाभाऊ पाटील, कडेपूर येथील मदने वकील, प्रकाश सातपुते तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आर पी आय व इतर मित्र पक्षांचे राज्य, जिल्हा तसेच स्थानिक पातळीवरील नेते आणि प्रचंड मोठ्या संख्येने कॉंग्रेस कार्यकर्ते महिला व पुरुष तसेच नागरिक उपस्थित होते.

 

अखेरच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहीन: डॉ. विश्वजीत कदम

by कौशल धर्मे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
माझी उमेदवारी ही संधी नव्हे तर साहेबांचे काम पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी: डॉ. विश्वजित कदम

कडेगाव (कौशल धर्मे): काँग्रेस पक्षाने मला दिलेली उमेदवारी ही संधी नसून जबाबदारी असल्याचे वक्तव्य डॉ. विश्वजित कदम यांनी काल झालेल्या

Close