डॉ. विश्वजित हे लोकांसाठी संघर्ष करणारे नेते: सतेज (बंटी) पाटील0 मिनिटे
कडेगाव: आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत डॉ. विश्वजीत कदम यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यांनी सतत लोकांच्या भल्यासाठी संघर्षाची भूमिका घेतली आहे, अश्या शब्दात बंटी पाटील यांनी डॉ. विश्वजीत कदम यांच्या उमेदवारीस आज कडेगाव इथे पाठींबा व्यक्त केला.
पलूस-कडेगावचे दिवंगत आमदार माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी सध्या पोटनिवडणूक घोषित झाली आहे. आज या निवडणुकीसाठी साहेबांचे सुपुत्र आणि महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने, कडेगाव येथे भव्य जन निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
साहेबांनी अखेरपर्यंत सगळ्यांना घरच्यासारखे वागवले. साहेबांच्या अकाली जाण्याने विकासकामांची व नेतृत्वाची धुरा विश्वजीत कदम यांच्या खांद्यावर आली आहे. दिवंगत साहेबांच्या विकासकामांचा आवाका मोठा होता आणि प्रत्येक गावात किमान २०-२५ घरातील व्यक्तींना त्यांनी नोकऱ्या दिल्या, असे प्रतिपादन त्यांनी केले.
साहेबांनी जी माया जनतेला दिली तशीच माया जनेतेने डॉ. विश्वजीत कदम व कदम कुटुंबियांना देण्याची वेळ आली आहे, अश्या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पोटनिवडणुकीसाठी त्यांनी डॉ. विश्वजीत कदम यांना आपला पाठींबा प्रकटपणे दर्शविला.