डॉ. विश्वजित कदम हे देश पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता असणारे नेते: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (कौशल धर्मे): देशाच्या पातळीवर नेतृत्व करण्यास आवश्यक ती क्षमता व परिश्रम करण्याची तयारी असणारे नेते, अश्या शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज डॉ विश्वजीत कदम यांना पोटनिवडणुकीमधील उमेदवारीस शुभेच्छा दिल्या.

माजी मंत्री व आमदार दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून यासाठी कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्र प्रदेश युवा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली आहे. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कडेगाव इथं दाखल केला. या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या जन निर्धार सभेमध्ये चव्हाण बोलत होते.

पतंगरावांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वजित कदम यांना बळ द्या आणि त्यांना विकासाच्या नव्या अध्यायाची सुरु करू द्या, असे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी बोलताना केले.

विश्वजित कदम यांचे नेतृत्व आपल्याला सर्वाना मिळून मोठे करायचे आहे आणि ते आपण करुया, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

माजी मंत्री डॉ पतंगराव कदम यांच्या जाण्याने एक खंदा सहकारी गेल्याची भावना मनात आहे ,असे त्यांनी सांगितले.  पतंगरावांनी शिक्षण, सहकार आणि राजकारण यामध्ये एक विश्व उभे केले असे त्यांनी सांगितले.

आज कडेगाव इथं आयोजित करण्यात आलेल्या जन निर्धार मेळाव्यामध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी तसेच आरपीआय व इतर मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते. उन्हाचा कडाका असतानाही मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते तसेच नागरिक या प्रसंगी उपस्थित होते.

आजच्या जन निर्धार मेळाव्यास  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार प्रतीक पाटील, माण-खटावचे नेते जयकुमार गोरे, कोल्हापूरचे नेते सतेज (बंटी) पाटील, सांगली विधानपरिषदेचे आमदार मोहनराव कदम, ज्येष्ठ नेते विलासराव शिंदे, सांगलीचे नेते सत्यजित देशमुख, सांगलीच्या नेत्या जयश्रीताई पाटील, पुण्याचे नेते अभय छाजेड, कराडचे नेते आनंदराव पाटील, पृथ्वीराज पाटील, सांगलीचे नेते हारुणभाई शिकलगार, माजी आमदार हफिजभाई धतुरे यांचे सुपुत्र,  आर पी आय चे नेते खरात, सदाभाऊ पाटील, मदने वकील, प्रकाश सातपुते तसेच कॉंग्रेस ,राष्ट्रवादी कॉंग्रेस, आर पी आय व इतर मित्र पक्षांचे राज्य, जिल्हा तसेच स्थानिक पातळीवरील नेते आणि प्रचंड मोठ्या संख्येने कॉंग्रेस कार्यकर्ते महिला व पुरुष तसेच नागरिक उपस्थित होते.

 

डॉ. विश्वजित कदम हे देश पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता असणारे नेते: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

by कौशल धर्मे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
अखेरच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहीन: डॉ. विश्वजीत कदम

कडेगाव (कौशल धर्मे): पलूस-कडेगावची जनताच माझी ढाल आहे, अश्या शब्दात आज  दिवंगत आ. डॉ. पतंगराव कदम यांचे सुपुत्र व महाराष्ट्र

Close