डॉ. विश्वजीत कदम म्हणजे समाजाचे अचूक ज्ञान असणारा उमेदवार: मा. मंत्री हर्षवर्धन पाटील0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: डॉ. विश्वजीत कदम म्हणजे समाजाचे अचूक ज्ञान असणारा उमेदवार, असे प्रतिपादन मा. मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

माजी मंत्री व आमदार दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून यासाठी कॉंग्रेस पक्षाने साहेबांचे सुपुत्र व महाराष्ट्र प्रदेश युवा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली आहे.

आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या जन निर्धार सभेमध्ये हर्षवर्धन पाटील  यांनी आपले विचार व्यक्त केले.

डॉ. पतंगराव कदम यांनी भागतल्या तीन पिढ्यांचा विकास केला. साहेबांच्या जाण्याने जी पोकळी तयारी झाली आहे ती कधीही भरून न निघणारी आहे, अश्या शब्दात त्यांनी डॉ. पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहिली.

पलूस-कडेगाव हा महाराष्ट्रातील सुसंस्कृत मतदार संघ असून सध्याची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

कोणताही प्रसंग आला तरी आम्ही विश्वजीत कदम यांच्या पाठीशी उभे राहू, असे विधान त्यांनी या प्रसंगी बोलताना केले.

 

डॉ. विश्वजीत कदम म्हणजे समाजाचे अचूक ज्ञान असणारा उमेदवार: मा. मंत्री हर्षवर्धन पाटील

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कदम कुटुंबीय गेल्या ३० वर्षापासून जनतेच्या सेवेत: आ. मोहनराव (दादा) कदम

कडेगाव: कदम कुटुंबीयांनी आजपर्यंत कधीच कुणाशी दुजाभाव केला नाही आणि गेली तीस वर्षे घराने जनतेची सेवा केली, अश्या शब्दात आ.

Close