मी साहेबांचा खासदार म्हणून वावरलो: माजी खा. प्रतिक पाटील0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: साहेबांनी केलेल्या विकासकामांमुळेच पलूस व कडेगाव परिसर आणि सांगली जिल्ह्यामध्ये सर्वत्र अगदी उन्हाळ्यातही हिरवळ आहे, अश्या शब्दात माजी खासदार प्रतिक पाटील यांनी साहेबांच्या विकास दृष्टीविषयी आदर व्यक्त केला.

साहेबांनी म्हैसाळ, ताकारी योजनामध्येसुद्धा तितकेच लक्ष दिले होते.  ‘मी साहेबांचा खासदार म्हणून वावरलो’, अश्या शब्दात त्यांनी साहेबांच्या धडाडीच्या विकासकामांचे कौतुक केले. पलूस-कडेगाव इथे होत असणाऱ्या पोटनिवडणुकीच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या  जन निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने ते बोलत होते.

दिवंगत आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आज त्यांचे चिरंजीव आणि  महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यानिमित्ताने साहेबांच्या विकासाचे केंद्रस्थान असलेल्या कडेगाव इथे भव्य जन निर्धार सभेचे अयोजान करण्यात आले होते.

या सभेमध्ये बोलताना प्रतिक पाटील म्हणाले की प्रत्येकाला कुठे ना कुठे साहेबांच्यामुळे मदत मिळाली आहे आणि त्याची जाणीव म्हणूनच डॉ. विश्वजीत कदम खात्रीने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आम्ही या मतदार संघात पाहुणे आहोत त्यामुळे आम्ही फक्त पाठींबा व्यक्त करू परंतु खरी जबाबदारी ही भागातल्या जनतेवर असल्याचे विधान त्यांनी केले.

 

मी साहेबांचा खासदार म्हणून वावरलो: माजी खा. प्रतिक पाटील

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
डॉ. विश्वजित हे लोकांसाठी संघर्ष करणारे नेते: सतेज (बंटी) पाटील

कडेगाव: आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत डॉ. विश्वजीत कदम यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यांनी सतत लोकांच्या भल्यासाठी संघर्षाची भूमिका घेतली आहे,

Close