भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी: उद्या अर्ज दाखल करणार0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघामध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते उद्या अर्ज दाखल करतील आणि सभेला उद्देशून कडेगाव इथे भाषण करतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

उद्या संग्रामसिंह देशमुख यांची कडेगावमधील सभा यशस्वी करण्यासाठी भाजप कार्यकर्ते वेगात कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. या सभेस भाजपचे अनेक मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

भाजपने सुरवातीपासून आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती, त्यावर अखेर पडदा पडला आहे. देशमुख सध्या सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहेत.

सकृदर्शनी कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशी ही लढत असणार आहे. कॉंग्रेसकडून दिवंगत आमदार व माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे सुपुत्र डॉ. विश्वजित कदम यांनी ७ तारखेस अर्ज दाखल केला आहे. कॉंग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत भव्य जननिर्धार मेळाव्याचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते. त्या सभेस मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.  डॉ. पतंगराव कदम यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे.

कदम विरुद्ध देशमुख असे पारंपारिक प्रतिस्पर्धी उतरल्याने या निवडणुकीत वेगळीच चुरस पाहायला मिळेल असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.

नुकत्याच सोशल मिडीयावर आलेल्या दशमुख यांच्या उमेदवारीच्या वृत्ताने कार्यकर्त्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे.

भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत कोणते प्रचार तंत्र वापरणार याविषयी जनतेमध्ये उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, डॉ. विश्वजीत कदम यांचा प्रचार व मतदार संपर्क वेगात सुरु असून आज नेर्ली येथे संध्याकाळी ७ वाजता कार्यकर्त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी: उद्या अर्ज दाखल करणार

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
बाळासाहेब म्हणजे प्रचंड उर्जा व क्षमता असणारा नेता: आ. जयकुमार गोरे

कडेगाव:  विश्वजीत कदम हे प्रचंड उर्जा आणि क्षमता असणारा नेता असून प्रत्येक ठिकाणी धडाडीने काम करण्याची पात्रता त्यांच्या अंगी असल्याचे

Close