कॉंग्रेसने परंपरा मोडल्यानेच भाजपवर निवडणूक लढवण्याची वेळ आली: पृथ्वीराज देशमुख0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: विद्यमान आमदार किंवा खासदार यांचे निधन झाल्यास होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार उभा करायचा नाही, हा संकेत कॉंग्रेसने अनेक ठिकाणी न पाळल्यामुळेच भाजपला पलूस-कडेगाव ची निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे, असे विधान भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले. संग्रामसिंह देशमुख यांनी आज भाजपतर्फे आपली उमेदवारी दाखल केली. या निमित्त भरलेल्या कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते.

लोकसभेच्या उमेदवारी संबंधी ज्या वावड्या उठवल्या जातायत त्या खोट्या असून संजयकाकाच सांगलीचे खासदार पदाचे भाजपचे उमेदवार असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात पत्रकारांनी बातम्या देताना काळजी घ्यावी, असे त्यांनी सुचवले.

देशमुख घराण्याच्या राजकीय व सामाजिक परंपरेविषयी बोलताना ‘आमचे घराणे सुसंस्कृत आहे’, असे त्यांनी विधान केले.

कॉंग्रेस व राष्ट्रवादीमधील ‘इंटरनल’ गटबंधन आपल्याला माहिती आहे, असे त्यांनी सांगितले तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये एकाच जल्लोष उडाला.

भाजपची सांगलीची लाट आता साताऱ्यात पसरत आहे, असे त्यांनी सूचित केले व अतुल भोसले यांच्या कामाचे कौतुक केले.

निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडे अत्यंत सक्षम यंत्रणा असून ती यंत्रणा प्रभावीपणे वापरून ही निवडणूक लढवली जाईल, असे त्यांनी सांगितले.

 

कॉंग्रेसने परंपरा मोडल्यानेच भाजपवर निवडणूक लढवण्याची वेळ आली: पृथ्वीराज देशमुख

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘पलूस-कडेगाव’चा विकास करण्याची क्षमता भाजपमध्ये: संग्रामसिंह देशमुख

कडेगाव: पलूस-कडेगावचा विकास करण्याची क्षमता भाजप मध्ये आहे, असे प्रतिपादन भाजपचे नेते व सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी

Close