संग्रामभाऊंच्या उमेदवारीने कॉंग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण: गोपीचंद पडळकर0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: संग्राम भाऊंच्या उमेदवारीने कॉंग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे, असे विधान भाजपचे स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर यांनी कडेगाव इथे भाजप कार्यकर्त्यांच्या सभेला उद्देशून केले.

पलूस-कडेगाव मधून विधानसभेसाठी भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. या प्रसंगी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेस उद्देशून पडळकर यांनी आज भाषण केले.

संग्रामभाऊ आपल्याला कधीही भेटू शकतील आणि आपल्याला उद्या आमदाराच्या भेटीची वाट बघावी लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.

पलूस-कडेगावची निवडणूक ‘भावनिक’ होणार नसून सरळ लढत कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशी असेल, असे त्यांनी बोलताना सांगितले.

कॉंग्रसचे उमेदवार गोरगरीब जनतेमध्ये मिसळू शकत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

आपल्या भाषणादरम्यान त्यांनी दोनदा कथा सांगत मुद्दे पटवून दिले तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये हशा-टाळ्या असे उत्साही वातावरण पसरले.

उन्हाचा  जोर असतानाही अनेक कार्यकर्ते अगदी उत्साहाने सभेत सामील झाले. मतदार संघामध्ये क्रांती आणि परिवर्तन अटळ असल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले.

बोलताना त्यांनी सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपने केलेल्या विकासकामांची माहिती दिली आणि रस्त्यासाठी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त निधी सांगली जिल्ह्याला आल्याचे त्यांनी सांगितले.

ही पोटनिवडणुक ताकदीने लढवावी, असे गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून आवाहन केले.

संग्रामभाऊंच्या उमेदवारीने कॉंग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण: गोपीचंद पडळकर

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
देशमुख कुटुंबीय सामान्य माणसांसाठी लढणारे: खा. संजयकाका पाटील

कडेगाव: देशमुख कुटुंबीय सामान्य माणसांसाठी लढणारे आहे, आणि, टेंभूसारख्या योजनांचा भागातील शेतकऱ्याला प्रचंड फायदा झाला असल्याचे खा. संजयकाका पाटील यांनी

Close