देशमुख कुटुंबीय सामान्य माणसांसाठी लढणारे: खा. संजयकाका पाटील0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: देशमुख कुटुंबीय सामान्य माणसांसाठी लढणारे आहे, आणि, टेंभूसारख्या योजनांचा भागातील शेतकऱ्याला प्रचंड फायदा झाला असल्याचे खा. संजयकाका पाटील यांनी सांगितले. ते आज कडेगाव इथे भाजपचे आमदार पदासाठीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांचा अर्ज दाखल केल्यानिमित्त भरलेल्या मेळाव्यात बोलत होते.

दिवंगत आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत आहे.

भाजप तर्फे सांगली जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आज त्यांनी अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला अर्ज कडेगाव येथील कार्यालयात दाखल केला.

खासदार पाटील म्हणाले की संग्रामसिंह देशमुख यांचे ग्रह बरे आहेत हे जिल्हा परिषदेवरून दिसून येत आहे.

येत्या १३-१४ दिवसात ताकदीने काम करून, प्रचार करून विजय प्राप्त करावा , असे आवाहन त्यांनी भाजप[ कार्यकर्त्यांना उद्देशून केले.

 

देशमुख कुटुंबीय सामान्य माणसांसाठी लढणारे: खा. संजयकाका पाटील

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कॉंग्रेसने परंपरा मोडल्यानेच भाजपवर निवडणूक लढवण्याची वेळ आली: पृथ्वीराज देशमुख

कडेगाव: विद्यमान आमदार किंवा खासदार यांचे निधन झाल्यास होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार उभा करायचा नाही, हा संकेत कॉंग्रेसने अनेक ठिकाणी न

Close