भाजप नेत्यांच्या उपस्थितीत संग्राम देशमुख यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: भाजपतर्फे आज पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी संग्रामसिंह देशमुख यांचा अर्ज दाखल करण्यात आला.

अर्ज दाखल करण्यसाठी भाजपचे जिल्हा तसेच महाराष्ट्रातील अनेक नेते उपस्थित होते.

या प्रसंगी कार्यकर्त्यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये अनेक मान्यवरांनी भाषण करून मनोगत व्यक्त केले.

अतुल भोसले

संग्रामसिंह देशमुख व पृथ्वीराज देशमुख सामान्य माणसला विश्वास वाटेल असे काम करत आहेत. मी तरुणांच्या फळीला आवाहन करतो की त्यांनी आपल्या नेतृत्वाला, संग्राम भाऊना मोठे करावे.

विलासराव जगताप

भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. कर्तृत्वाचा विचार करता संग्रामभाऊ सरस आहेत. सर्वांनी ताकदीने प्रचाराला लागावे.

अजितराव घोरपडे सरकार

परिवर्तनाची संधी मतदारांच्या हातात आहे. या तालुक्यात परिवर्तनाची लाट येईल. जिल्हा परिषद कशी चालवावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संग्रामसिंह देशमुख. पोटनिवडणुकीत झोकून देवून प्रचाराचे काम करा.

आ. सुधीर गाडगीळ

संग्रामसिंह देशमुखांची उमेदवारी ही काळाची गरज आहे. पक्षाने घेतलेला निर्णय मान्य करत सर्वांनी कलाम लागावे.

शिवाजीराव नाईक

संग्रामसिंह देशमुख हे चैतन्यशील पद्धतीचे तरुण. देशमुख घराण्यामध्ये राजकीय व सामाजिक कार्याची परंपरा आहे. भाजपचा आमदार निवडून आणायचा ही भूमिका घेवून कामा लागावे.

आ. सुरेश खाडे

मोदी कॉंग्रेसमुक्त भारत करत आहेत तसाच हा जिल्हा कॉंग्रेसमुक्त केला जावा. जनतेमध्ये कमळ फुलले आहे. भाजपचे विधानसभेतील आमदार वाढवणे ही काळाची गरज आहे.

राजाराम गरूड यांनी प्रास्ताविक केले तर धनंजय देशमुख (भैय्यासाहेब) यांनी आभार मानले.

भाजप नेत्यांच्या उपस्थितीत संग्राम देशमुख यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
संग्रामभाऊंच्या उमेदवारीने कॉंग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण: गोपीचंद पडळकर

कडेगाव: संग्राम भाऊंच्या उमेदवारीने कॉंग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे, असे विधान भाजपचे स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर यांनी कडेगाव इथे

Close