डॉ. विश्वजीत कदम ‘पलूस-कडेगाव’चे आमदार: पोटनिवडणूक अखेर बिनविरोध0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: संपूर्ण राज्याची उत्कंठा शिगेला पोचवणारी म्हणून ज्या निवडणुकीस पहिले जाते ती पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक अखेर डॉ. विश्वजीत कदम यांनी बिनविरोध जिंकली आहे.

दिवंगत आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक लागली होती.

डॉ. विश्वजीत कदम बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर झाल्यावर कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये साहेबांना समर्पक अशी श्रद्धांजली मिळाली असल्याची भावना होती. डॉ. विश्वजीत कदम यांच्या विजयाने पुन्हा एकदा पलूस-कडेगाव हा कदम घराण्याचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध झाले आहे.

कै. आ. डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाच्या स्मृती ताज्या असल्याने सांगली विधानपरिषदेचे आमदार मोहनराव कदम (दादा) यांनी कार्यकर्त्यांना फटाके व गुलाल वापरू नका, असे सांगितले होते. डॉ. पतंगराव कदम यांच्या अकाली निधनाने ही पोटनिवडणुक कदम कुटुंबीय, कॉंग्रेस पक्ष आणि कार्यकर्ते यांच्यासाठी सुरवातीपासून भावनिक राहिली आहे.

बिनविरोध निवडीच्या घोषणेनंतर लगेचच डॉ. विश्वजीत कदम यांनी सोनहिरा कारखान्यासमोरील साहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले व भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

 

अगदी सुरवातीपासून डॉ. विश्वजीत कदम यांनी कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेते तसेच आ. मोहनराव कदम यांच्यासह या पोटनिवडणुकीच्या रणनीतीमध्ये आघाडी घेतली होती. ७ मे ला कॉंग्रेस-राष्ट्रवादी-आरपीआय आघाडीचे नेते व अनेक कार्यकर्ते यांच्यासोबत अर्ज भरला आणि तत्काळ भव्य जननिर्धार मोर्च्यामध्ये आपली पोटनिवडणुकीसंबंधी भूमिका स्पष्ट केली होती.  त्यानंतर, अनेक गावांमध्ये सभा, कोपरा सभा, गृह भेटी तसेच पदयात्रा आयोजित करत संपूर्ण मतदार संघाशी संवाद साधणे सुरु होते.

डॉ. विश्वजीत कदम ‘पलूस-कडेगाव’चे आमदार: पोटनिवडणूक अखेर बिनविरोध

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘पलूस-कडेगाव’ मध्ये सोशल मिडियावरची निवडणूक नक्की कोण जिंकणार? (विशेष लेख)

पलूस-कडेगावची पोटनिवडणूक प्रत्यक्षात जरी काही दिवसापूर्वी सुरु झाली असली तरी सोशल मिडीयावर ती खूप आधीपासून सुरु आहे. ‘आपल्या भागाचा नेता

Close