‘ महात्मा बसवन्ना सर्वांसाठी ‘ परीसंवादाचे पुण्यात रविवारी (दि. २७) आयोजन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पुणे: ‘ महात्मा बसवन्ना सर्वांसाठी ‘ या परीसंवादाचे पुण्यात येत्या रविवारी (दि. २७) रोजी आयोजन करण्यात आले आहे.

अखिल भारतीय बसव समिती आणि वचन अकादमी, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या परीसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

गांजवे चौक पुणे येथील पत्रकार भवन येथे सकाळी ९. ३० पासून परिसंवादास सुरवात होईल, अशी माहिती शरण बसवराज कनजे व आयोजन समितीने दिली आहे.

या परीसंवादाच्या अध्यक्षस्थानी बसव समितीचे अध्यक्ष आणि माजी राष्ट्रपती जत्ती यांचे सुपुत्र श. अरविंद जत्ती असतील.

मुख्य उद्घाटक लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या कॉ. मुक्ता मनोहर असतील.

प्रमुख वक्त्यांमध्ये प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार (बहुजनवादी महात्मा बसवन्ना) तसेच प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे (लिंगायत धर्माचा इतिहास व तत्वज्ञान ) हे असतील.

समारोप सत्रामध्ये ‘वचन अकादमी, महाराष्ट्र’ चे विद्यमान उपाध्यक्ष व लिंगायत धर्म संशोधक प्रा. भीमराव पाटील असतील. दुसरे व्याख्यान डॉ. काशिनाथ अम्बलगे यांचे असेल.

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती असेल डॉ. शमसुद्दीन तांबोळी, प्रा. संगमेश भैरगोंड, प्रा. प्रतिमाताई परदेशी, चंद्रकांता सोनकांबळे, विनोद शिरसाठ, बाबासाहेब त्रिभुवन, डॉ. विवेक घोटाळे, अन्वर राजन, शिवानंद हैबतपुरे,  डॉ. प्रकाश हसनाळकर, ज्ञानेश्वर मोंढे, नरेंद्र व्यवहारे, किर्दत मुकुंद, वैशालीताई उबाळे, मनीषा महाजन, पी बी कुंभार यांची.

प्रास्ताविकाची जबाबदारी असेल प्रा. डॉ. रत्नाकर लक्षटे व प्रा. डॉ. नलिनी वाघमारे यांच्याकडे तर सूत्रसंचालन करतील प्रा. डॉ. सचितानंद बिचेवार, आणि प्रा. डॉ. संतोषकुमार गाजले.  आभाराचे भाषण करतील रमेश कोरे व अभ्यासक राजू जुबरे.

परिसंवादासाठी उपस्थित राहू इच्छिणाऱ्या नागरीकांनी शरण बसवराज कनजे यांच्याशी ९८८१६०२२०२ या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

‘ महात्मा बसवन्ना सर्वांसाठी ‘ परीसंवादाचे पुण्यात रविवारी (दि. २७) आयोजन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
Products For CryptoBoom Across The Uk

Fx trading Secret - The Secret Designed to Lead You In Reaping Fortunes In The Currency Promote A high level

Close