नवनिर्वाचित आमदार डॉ. विश्वजीत कदम यांची आभार सभा व सत्कार संपन्न0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघामधील पोटनिवडनुकीत बिनविरोध निर्वाचित झालेले आमदार डॉ. विश्वजीत कदम यांची आभार सभा व सत्कार काल कडेगाव इथे संपन्न झाला.

गावातील भैरवनाथ मंदिरासमोरील आवारात ही आभार व सत्कार सभा संपन्न झाली.

निर्वाचित झाल्यापासून डॉ. कदम मतदारसंघातील जवळ जवळ सर्व ठिकाणी आभार सभांमधून मतदारांशी संवाद साधत आहेत.

सभा व सत्कार अत्यंत सुचनेनुसार साधेपणाने करण्यात आला. दिवंगत आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या अकाली निधनाने रीक्त झालेल्या जागेसाठी सदर पोटनिवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये साहेबांचे सुपुत्र डॉ विश्वजीत कदम बिनविरोध निवडून आले.

साहेबांच्या अकाली निधनाने सदर निवडणूक आणि तत्पश्चात घेण्यात आलेले इतर कार्यक्रम कॉंग्रेस पक्ष तसेच साहेबप्रेमी नागरीकांसाठी अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडत आहेत.

काल झालेल्या आभार सभेत कडेगाव मधील कॉंग्रेस कमिटीचे सदस्य व कॉंग्रेस कार्यकर्ते तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेनंतर माजी सरपंच विजयराव शिंदे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.

आभार सभेच्या दरम्यान व नंतर अनेक नागरीकांनी डॉ. कदम यांचे अभिनंदन केले व विविध कामांसंबंधी निवेदन दिले.

नवनिर्वाचित आमदार डॉ. विश्वजीत कदम यांची आभार सभा व सत्कार संपन्न

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
प्रशांत लेंगरे यांना ‘दि प्राईड ऑफ इंडीया भास्कर अवॉर्ड’ पणजी येथे प्रदान

पलूस : युवा नेते प्रशांत लेंगरे यांना पणजी येथे एका शानदार सोहळ्यात  'दि प्राईड ऑफ इंडीया भास्कर अवॉर्ड'  प्रदान करण्यात

Close