प्रशांत लेंगरे यांना ‘दि प्राईड ऑफ इंडीया भास्कर अवॉर्ड’ पणजी येथे प्रदान0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस : युवा नेते प्रशांत लेंगरे यांना पणजी येथे एका शानदार सोहळ्यात  ‘दि प्राईड ऑफ इंडीया भास्कर अवॉर्ड’  प्रदान करण्यात आला.

युवक संघटन, लोकविकास, आणि सामाजिक क्षेत्रातील अलौकीक कार्या प्रती ‘महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन’ या संस्थेच्या वतीने प्रतीवर्षी देण्यात येणारा हा राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो.

दिनानाथ मंगेशकर कला अकादमी, पणजी-गोवा येथे  गौरव समारंभात सदरील पुरस्कार नरेंद्र मोदी यांचे भाऊ सोमाभाई मोदी यांचे  हस्ते प्रदान करण्यात आला.

युवा नेते प्रशांत लेंगरे-दादा यांनी अल्पावधिमध्ये सामाजिक कार्यात केलेले विशेष कार्य उल्लेखनिय आहे. सर्वसामांन्य जनतेसाठी झटणारे आदर्श व्यक्तीमत्व म्हणून त्यांची पलूस तालुक्यासह सांगली जिल्हयामध्ये विशेष ओळख आहे. भरकटलेल्या तरूणांना योग्य दिशा देउन त्यांच्या जिवनमानाचा स्तर उंचावण्यासाठी युवा नेते प्रशांत लेंगरे (दादा ) यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

मुरलेल्या राजकीय व्यक्तीमत्वालाही लाजवेल अशी त्यांची कार्यशैली आहे. युवकांच्या अडी-अडचनींना धावून जाने ही त्यांची खासीयत. म्हणूनच ते युवकांच्या गळयातील ताईत बनले आहेत. त्यांच्या या कार्याची पोचपावती म्हणून शिवसेना प्रमूख मा. उध्दवसाहेब ठाकरे यांनी त्यांना पक्षाची जबाबदारी दिली. पदापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून त्यांनी समोर आलेल्या व्यक्तीची, कोणत्याही राजकीय पक्षाची अथवा गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता सदैव मदत केली आहे आणि करत आहेत. त्यामुळेच ते लोकप्रिय युवानेते म्हणून उदयास आलेले आहेत.

पुरस्कार मिळाल्याबद्दल लेंगरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

प्रशांत लेंगरे यांना ‘दि प्राईड ऑफ इंडीया भास्कर अवॉर्ड’ पणजी येथे प्रदान

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
Options For Effective Solutions In Thai Woman

Singles Dating: Reasons Why Singles Choose Dating Online Just what are the 3 steps any particular one might find out

Close