‘यांचे’ ‘स्वच्छ भारत अभियान’ नक्की कुठपर्यंत पोचलय?0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: स्वच्छ भारतीय अभियान अंतर्गत गावांना हागणदारी मुक्त होणे आवश्यक आहे त्याचबरोबर प्रत्येक गावाच्या भौगोलिक मार्यादामध्ये असलेली सरकारी आणि खाजगी कार्यालये, शाळा, दवाखाने इत्यादी संस्थांमध्ये स्वच्छता सुविधा असणे आवश्यक आहे.

कडेगाव तसेच पलूस तालुका या दोन भागात असणारी सरकारी कार्यालये व शाळा नक्की कुठपर्यंत पोचली आहेत याची जनतेच्या वतीने शहानिशा होणे आवश्यक आहे. विशेषतः सुट्ट्या संपून शाळा सुरु होत आहेत त्यामुळे तिथे या सुविधा असणे विशेषतः मुलींसाठी आवश्यक आहे. यामध्ये शाळा व कॉलेज नक्की कुठेपर्यंत पोचली आहेत?  सरकारी कार्यालयामध्ये शाळेच्या विविध दाखल्यांसाठी गर्दी असते अशावेळी पावसाळी वातावरणाचा विचार करता स्वच्छता सुविधा असणे आवश्यक आहे.

यासंदर्भात आपले सरकारी कार्यालय किंवा इतर संस्था यामध्ये जर स्वच्छतेचा अभाव असेल, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नमूद केलेले लक्ष्य जर अजूनही दृष्टीक्षेपात नाही असे वाटत असेल तर त्यासंदर्भात सुधार होणे आवश्यक आहे.

येत्या काही दिवसात ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ यासंदर्भात वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांना व शाळांना भेट देवून तिथल्या संस्थाअंतर्गत स्वच्छता सुविधांविषयी लोकहित समोर ठेवून आवश्यक ती माहिती समोर आणेल.अस्वच्छ कार्यालय आणि इतर संस्था याविषयीची माहिती प्रसारित होईल.

त्याचबरोबर ज्या कार्यालयांनी स्वच्छता सुविधा चांगल्या पद्धतीने प्रस्थापित केल्या आहेत त्यांनी ते यश कसे साध्य केल त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात येईल ज्यामुळे यात मागे पडलेल्या संस्थाना आवश्यक ते मार्गदशन मिळेल.

आपणही यामध्ये सहभागी होऊन आवश्यक ती माहिती आम्हाला व्हाटसप करावी. आमचा नंबर आहे ८३९०४४२२३३.

 

‘यांचे’ ‘स्वच्छ भारत अभियान’ नक्की कुठपर्यंत पोचलय?

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
शिवकॄष्णाई संस्था व बसव ब्रिगेड तर्फे ‘लाडक्या’ एस टी चा वर्धापन दिन साजरा

कडेगाव: एस टी महामंडळाचा वर्धापन दिन आज कडेगाव बसस्थानकामध्ये श्री शिवकॄष्णाई संस्था व बसव ब्रिगेड तर्फे साजरा  करण्यात आला. यावेळी

Close