चीनने प्लास्टिक कचरा स्वीकारणे बंद केल्याने जागतिक स्तरावर चिंता0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: महाराष्ट्रभर सध्या लागू झालेल्या प्लास्टिक बंदीमुळे छोटे उद्योगधंदे संक्रमणातून जात आहेत. सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयावर जरी लोकांकडून विरोध होत असला तरी या निर्णयाशी सबंधित जागतिक चित्र पूर्ण तपासून पहिले असता आणखी व्यापक प्लास्टिक बंदीची किंबहुना संपूर्ण प्लास्टिक बंदीची गरज असल्याचे समोर येत आहे. याला कारण आहे चीन ने बंद केलेली प्लास्टिक कचरा आयातीवरील बंदी जी जागतिक पातळीवर सर्वत्र मोठी समस्या बनून राहिली आहे.

जागतिक स्तरावर चीनने घातलेल्या आयात बंदीमुळे २०३० पर्यंत १११ कोटी मेट्रिक टन प्लास्टिक कचरा जागतिक स्तरावर साठून राहील अशी चिंता तज्ञांनी व्यक्त केली आहे. ३१ डिसेंबर २०१७ पासून चीनने प्लास्टिक कचरा आयात बंदी सुरु केली आहे आणि तेव्हापासून जागतिक स्तरावर प्लास्टिक चे काय करायचे, हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच समोर आला आहे. १९९२ पासून चीनने जवळ जवळ जागतिक प्लास्टिक मधील ४५ % प्लास्टिकचा पुनर्वापर केला आहे. यामुळेच थायलंड, मलेशिया इत्यादी देशांनी प्लास्टिक वापर बंदी विषयी पाऊले उचलणे सुरु केले आहे.

प्लास्टिकच्या वापराबाबत पुनर्वापर करण्यासाठी आणि नको त्या ठिकाणी प्लास्टिक वापरणे बंद करण्यसाठी कठोर पाऊले उचलणे अत्यंत आवश्यक बनले आहे. जगातल्या सर्वच सरकारांना ही समस्या भेडसावत आहे. जैविक विघटन होऊ न शकणारे प्लास्टिक वेगवेगळ्या रुपात पर्यावरणाची आणि आरोग्याची हानी करत आहे. हे प्लास्टिक विघटन होत नसल्यामुळे साठून राहते आणि वाढत्या लोकसंखेच्या आणि जमिनीच्या आवश्यकतेच्या स्थितीमध्ये प्लास्टिक चे डोंगर साठून राहतात असे तज्ञांचे निरीक्षण आहे.

या संदर्भात सरकारने प्लास्टिक बंदी घालताना सार्वत्रिक लोकशिक्षण करणे आवश्यक आहे जेणेकरून पर्यावरण दृष्ट्या सजग अशी पिढी तयार होईल. महाराष्ट्रात घालण्यात आलेली प्लास्टिक बंदी कितपत यशस्वी होते आणि पर्यावरणावरील नकारात्मक परिणाम कसा कमी होतो हे कळण्यासाठी व्यापक प्लास्टिक बंदी किमान वर्षभर राबवण्यात आली पाहिजे, असे मत समोर येत आहे.

चीनने प्लास्टिक कचरा स्वीकारणे बंद केल्याने जागतिक स्तरावर चिंता

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
काला-चित्रपट नव्हे तर क्रांतीपट: चेतन सावंत

मागच्या आठवड्यातच बहुचर्चित पा. रंजिथ दिग्दर्शित सुपरस्टार रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेला 'काला' हा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा फक्त

Close