शेळकबाव इथं ‘सम्राट अशोक नगर’च्या नाम फलकाचे उदघाटन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: शेळकबाव (ता. कडेगाव) या ठिकाणच्या बैाध्द धर्मियांच्या मळ्याला आजपर्यंत जातीय नावाने (म्हारकी) उल्लेख केला जात होता, ती जातीवादी पद्धती बदलून त्या ठिकाणास ‘सम्राट अशोक नगर’ हे नाव देण्यात आले.

नामफलकाचे उदघाटन शेळकबावच्या कर्तव्यदक्ष सरपंच सैा. निर्मला दाभोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना सरपंच दाभोळे म्हणाल्या ‘सम्राट अशोक नगर’ हे नाव देऊन ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आहे. सम्राट अशोक हे भारताचे राजे होते, याचा सर्वाना सार्थ अभिमान आहे. शेळकबावचे बैाद्ध धर्मीय हे सामाजिक सलोखा जपणारे आहेत. गावातील सर्व सुजाण नागरीकांना ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन केले आहे की जातीय नावाचा उलेख कोणी करु नये. जे कोणी करत असतील त्याला समज दिली जाईल.

इथुन पुढच्या काळात सम्राट अशोक नगरचे सर्व प्रश्न सोडवुन या ठिकाणचे नंदनवन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकास कामासाठी गट- तट बाजुला ठेवुन शेळकबावचा सर्वांगीण विकास हेच ध्येय आणि उद्दिष्ट असल्याचेे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजक ग्रामपंचायत सदस्य संकेत (भाऊ) कांबळे म्हणाले, शेळकबाव हे एक आदर्श गाव आहे. इथे सगळे समाज गुण्यागोविंदाने राहतात. काही जुनाट विचाराच्या लोकांमुळे म्हारकी हे शेताला पडलेले जातीवाचक नाव आहे. शेळकबावच्या लोकाना त्यांनी भावनिक हाक घालत आवाहन केले की त्यांनी बुरसटलेल्या जातीवादी विचारात अडकू नये. आजपासुन सर्व गावकरी मंडळींनी जातीवाचक शब्दाचा उच्चार करु नये व कोणी करत असतील त्यांना मज्जाव करण्यात यावा, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जावु शकते.

या कार्यक्रम प्रसंगी सरपंच सैा. निर्मला दाभोळे, उपसरपंच सुनिल कदम, शेळकबावचे ग्रामपंचायत सदस्य संकेत (भाऊ) कांबळे, ग्रा पं सदस्य श्रीमंत (तात्या) पाटील, जेष्ठ नेते हणमंत (काका) दाभोळे, ग्रामविकास अधिकारी राजशेखर चव्हाण साहेब, युवानेते वसंत तुपे, सूर्यकांत पाटील, संजय भगत, अजय कांबळे (आण्णासाहेब), आकाश खरात, प्रकाश घाडगे, सुरज खरात (सर), प्रकाश दोडके, नारायण खरात, सतिश खरात, निवास खरात, भगवान कांबळे, दिलीप कांबळे, मनोहर खरात, धनाजी कांबळे, बाळासो कांबळे, निवृत्ति कांबळे, उत्तम खरात, नरेश खरात, दत्तात्रय दंडवते, संगिता कांबळे, सुषमा खरात, सजाबाई दोडके, लता खरात, ज्योति कांबळे, अर्चना कांबळे, शालन कांबळे, अलका खरात इत्यादि महिला कार्यकर्त्या व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेळकबाव इथं ‘सम्राट अशोक नगर’च्या नाम फलकाचे उदघाटन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
चीनने प्लास्टिक कचरा स्वीकारणे बंद केल्याने जागतिक स्तरावर चिंता

कडेगाव: महाराष्ट्रभर सध्या लागू झालेल्या प्लास्टिक बंदीमुळे छोटे उद्योगधंदे संक्रमणातून जात आहेत. सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयावर जरी लोकांकडून विरोध होत

Close