शेळकबाव आंबेडकर नगर येथे वृक्षारोपण उत्साहात0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: शेळकबाव (ता. कडेगाव) येथे वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सामाजिक कार्यकर्ता व ग्रामपंचायत सदस्य संकेत (भाऊ) कांबळे व जेष्ठ नेते हणमंत दाभोळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे वृक्ष लागवड करण्यात आली.

या प्रसंगी कांबळे म्हणाले, आयुष्यात जशी नाती जपतो तशीच नाती आपण झाडांसोबत सुध्दा जपायला हवीत. निसर्ग आणि माणुस यांचे एक नातं माणुस जन्माला आल्यापासुन मरेपर्यत असते. आज घडीला तंत्रज्ञानाच्या जंजाळात माणुस इतका हरवुन जातो की त्याला या नात्याची जाणीव क्वचित होते. आशा परिस्थिति मध्ये वृक्ष दिंडी आणि वृक्षारोपण यासारखे उपक्रम तरूण पिढीने हती घेतल्यास पर्यावरणाची होणारी हानी थांबेल. याड लागलं म्हणत बसण्यापेक्षा झाड लावलं तर नक्कीच पाऊस झिंगझिंगाट पडेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी उपसरपंच सुनिल कदम, ग्रामपंचायत सदस्य संकेत (भाऊ) कांबळे, हणमंत दाभोळे, शिवाजी गुरव, सूर्यकांत पाटील, बाळासो कांबळे, नारायण खरात, प्रकाश घाडगे, अजय कांबळे, सुरज खरात, नितिन खरात यांच्या सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

स्वागत ग्रामसेवक राजशेखर चव्हाण यांनी केले. आभार आकाश खरात यांनी मानले.

शेळकबाव आंबेडकर नगर येथे वृक्षारोपण उत्साहात

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
Types of Literature

Eventually, though, remember that amazing writing doesn't occur by accident. You've done almost all of the catchy work currently within

Close